जागतिक भालाफेक स्पर्धा जिंकून सुवर्ण पदक मिळवणारा मोहम्मद बेग वसीम बेग मिर्झा ठरला हिवरखेड मधील पहिला खेळाडू.
जागतिक भालाफेक स्पर्धा जिंकून सुवर्ण पदक मिळवणारा मोहम्मद बेग वसीम बेग मिर्झा ठरला हिवरखेड मधील पहिला खेळाडू.
शाहरुख शेख महाराष्ट्र प्रतिनिधि
हिवरखेड : हिवरखेड च्या इतिहासात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील भालाफेक स्पर्धेत सेंट पॉल्स अॅकेडमीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी मोहम्मद बेग वसीम बेग मिर्झा याने सुवर्ण पदक जिंकले.आपल्या अभ्यासाबरोबरच शालेय खेळात अग्रेसर असून तो केंद्रीय शाळांमधून घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये प्रथम स्थानी राहिला होता. त्याची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धा असोसिएशन फॉर ट्रॅडिशनल युथ गेम अँड स्पोर्ट तर्फ घेण्यात येणाऱ्या।
इंटरनॅशनल जवेलींग प्रो कॉम्पिटिशन स्पर्धेसाठी झाली होती. या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्णपदक मिळविले आहे.।
तो आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष नवनीत लाखोटिया, सचिव प्रमोद चांडक, गांधी मॅडम,शिक्षक, क्रीडा शिक्षक अनुप चांदणे व आई-वडिलांना देतो.
त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हिवरखेडचे नाव उज्ज्वल केल्यामुळे हिवरखेड शहरवासीयांसह सर्व खेळाडू मध्ये आनंदाचे वातावरण आहे. मोहम्मद बेग मिर्झा यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी व्हावं आणि देशासाठी पदक जिंकावं हे स्वप्न मनाशी त्याने बाळगलेल आहे.।
कोई टिप्पणी नहीं