माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक साहेब यांची जयंती साजरी
चाळीसगाव (प्रतिनिधी) दि 1 जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती शिंदी येथील संस्कार गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये साजरी करण्यात आली. या प्रसंगी ग्लोबल बंजारा अस्तित्व फॉउंडेशन चे अध्यक्ष अशोक राठोड यांनी नाईक साहेबांविषयी त्यांचा परिचय व कार्यविषयीं सांगितले वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ विराजमान होते. नाईक यांचा जन्म पुसद जवळील गहुली या छोट्याशा खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात १ जुलै १९१३ रोजी झाला. वसंतराव नाईक हरितक्रांती , पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात.माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत." या शब्दात नाईकांचा गौरव केला. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीच्या दूरगामी योजना राबवल्या. महानायक वसंतराव नाईक यांना केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीच जाणीव नव्हती तर, दूरगामी स्वरुपाच्या उपाययोजना सुद्धा त्यांनी केल्या. शेती आणि शेतकऱ्यांशी त्यांची नाळ कायम जुळलेली होती. कठीण काळातही क्रांतीकारी कार्य नाईकांनी केले. त्यामुळे त्यांना 'शेतकऱ्यांचा जाणता राजा', 'हरितयोद्धा' म्हणून संबोधतात. प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांनी 'आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत' या शब्दात वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. महानायक वसंतराव नाईक हे एक केवळ नाव नसून शाश्वत विकासाची एक लोकाभिमुख विचारधारा आहे. असे विदयार्थ्यांना साहेबांचा परिचय व त्यांच्या कार्यविषयी सांगतिले या प्रसंगी शाळेचे मुख्यध्यापिका आरती मॅडम, पुजा मॅडम, उज्वला मॅडम, व पालक उपस्तिथ होते.
कोई टिप्पणी नहीं