rashtriya news ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन तर्फे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री मा.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त वृक्षरोपण. - rashtriya news khabre Desh prdesh ki

Header Ads

ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन तर्फे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री मा.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त वृक्षरोपण.

चाळीसगाव (प्रतिनिधी) दि.१२ मार्च १९१३ रोजी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे पाचवे उप प्रधानमंत्री मा.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य तर्फे शिंदी येथे वृक्षारोपण करण्यात आले.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी मा.यशवंतराव बळवंतराव चव्हाण कराड महाराष्ट्र  हे महाराष्ट्राचे पहिले   मुख्यमंत्री होते त्याचा कार्यकाळ १९६० ते १९६२ इतका होता. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला जन्म  सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी १ मे १९५८ रोजी धुम्या गडावर जाऊन तिथे पांडुरंगाची मूर्ती स्थापन केली व राष्ट्रसंत भगवानबाबांच्याच्या समोर धूम्या गडास भगवानगड नाव दिले. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ, ऋणानुबंध,ही त्यांची साहित्यसंपदा आहे. या प्रसंगी ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य तर्फे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी विशाल चव्हाण,रोहित राठोड,दादू राठोड,राहुल चव्हाण,सागर राठोड,आकाश राठोड, गोलू चव्हाण व नागरिक उपस्तिथ होते. व संस्थेचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी जीवन कार्याविषयीं नागरिकांना माहिती दिली.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.