रीना शेख ठरली सैन्यदलात जाणारी अकोटची पहिली मुस्लिम तरुणी,केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये निवड
रीना शेख ठरली सैन्यदलात जाणारी अकोटची पहिली मुस्लिम तरुणी,केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये निवड
मैत्रिणींनी केले जल्लोषात स्वागत
*अकोट चा नावलौकिक वाढवला*
महाराष्ट्र प्रतिनिधि: शाहरूख शेख
उंच भरारी घेण्याची हिंमत करत असाल तर अकोटचा रीना अंजुम शेख नाजीमच्या गगनभरारीची ही कहाणी वाचलीच पाहिजे.घरबांधणी करणाऱ्या मजुराच्या या मुलीने तिच्या स्वप्नांना पंख लावून उड्डाण केले आहे.ही झेप इतर मुलींसाठी आज प्रेरणास्थान झाली आहे.सैन्यदलात निवड झालेली किंबहुना ती पहिली मुस्लिम मुलगी ठरली आहे.
रीना शेखने संयुक्त स्थानक परिक्षेअंतर्गत (ssc) घेतल्या जाणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल;कॉन्स्टेबल (जिडी)ची परीक्षा उत्तीर्ण केली.
आज अकोटला परतल्यानंतर तिच्या मैत्रिणींनी या यशस्वीनीचे जल्लोषात स्वागत केले.
२०१९ पासून रीनाने स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरवात केली.
सुरवातीला तिला काही परीक्षांमध्ये अपयश आले.
सरळ सेवा परीक्षेत तिचे यश अवघ्या सहा मार्कांनी हुकले.त्यानंतर मुंबई पोलीस भरती परीक्षेत सुद्धा ती वेटिंग लिस्ट मध्ये होती.
सततच्या अपयशाला खचून न जाता तिने सातत्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली.
यानंतर नोव्हेंबर २०२२ ला स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात आलेल्या कॉन्स्टेबल जी.डी परीक्षेत तिने अर्ज भरला.
मात्र काहीच दिवसांनी तिचा अमरावती येथे अजर हुसेन यांच्याशी निकाह झाला.
पतीला सैन्य भरती ची तयारी करत असल्याची माहिती होतीच. त्यानेही तिला उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्याची मुभा दिली.
पती अजर हुसेन ट्रॅव्हल्स मध्ये कामाला आहे. तो भक्कमपणे तिच्या पाठीशी उभा राहिला.
शारीरिक क्षमता चाचणी मध्ये तयारीत कुठलीही अडचण येऊ नये म्हणून परीक्षा कालावधी पूर्ण होई पर्यंत पत्नीला आईवडिलांचा घरीच ठेवले होते.
बहिणी सोबत दररोज ती धावण्याचा सराव करायची.
फेब्रुवारी २०२३ मध्ये लेखी परीक्षा आणी मे महिन्यात झालेल्या मैदानी चाचणीत तिने उत्तम गुण मिळवून स्टाफ सिलेक्शन अंतर्गत घेण्यात आलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल परीक्षेत तिची निवड करण्यात आली.
रीना शेख ही सध्या पतीसोबत अमरावतीला राहत असून ५ सप्टेंबर रोजी शिक्षण दिनी तिचे गुरू प्रा. कैलास वर्मा यांनी तिचा सत्कार केला.
शिकवणी वर्गाला सोबत असणाऱ्या इतर मुलींनी तिचे अकोट मध्ये येताच जंगी स्वागत केले होते.
रीना अंजुम शेख नाजीम ही अकोट तालुक्याच्या इतिहासात भारतीय सैन्य दलात दाखल होणारी पहिलीच मुस्लिम तरुणी असल्याचे तिचे शिक्षक प्रा. कैलास वर्मा यांनी सांगितले.
______________________
चौकट//-
माझ्या संपूर्ण कुटुंबानं मला साथ दिली. घरच्या अडचणीमुळं अभ्यासावरून माझं लक्ष विचलित होऊ नये याची काळजी घेतली. वडिल अगदी लेखी,मैदानी,परीक्षे पर्यंत तर पती वैद्यकीय चाचणी वेळी माझा सोबतच राहिले होते. या यशात माझ्या शिक्षकांचाही मोठा वाटा आहे.
रीना अंजुम शेख नाजीम
CISF मध्ये निवड
rashtriya news

कोई टिप्पणी नहीं