भर उन्हात दहीहाडा पोलिसांचे पथसंचलन*आगामी सण उत्सवनिमित्त राबविली मोहीम; चौकात घेण्यात आल्या कार्नर मिटीग
*भर उन्हात दहीहाडा पोलिसांचे पथसंचलन*
आगामी सण उत्सवनिमित्त राबविली मोहीम; चौकात घेण्यात आल्या कार्नर मिटीग
(महाराष्ट्र प्रतिनिधि शाहरुख शेख)
अकोला तालुक्यात येत असलेल्या दहीहांडा येथे आगामी सण श्रीराम नवमी महात्मा फुले जयंती भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंती हनुमान जयंती व रमजान महिना आदी उत्सव कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर शांततेत पार पाडण्याचे अनुषंगाने दहीहांडा पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील बस स्ट्यान्ड,बाजार रोड मजीत, ग्रामपंचायत चौक मुख्य रस्त्याने रुट मार्च काढण्यात आला यावेळी विविध चौकात नागरिकांच्या कॉनर मिटीग घेण्यात आल्यात व नागरिकांना आगामी उत्सव शांततेत व सामाजिक सलोखा ठेवून साजरे करणेबाबत सूचना दिल्यात तसेच आक्षेपार्ह व धार्मिक व सामाजिक सलोखा बिघडेल अशा पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्यात या पथसंचलना मध्ये दहीहांडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत, उपनिरीक्षक तथा दहीहांडा पोलीस कर्मचारी होते
*शांतता कमीटी सदस्यांना मार्गदर्शन*
आगामी काळात सर्व जाती-धर्माचे उत्सव साजरे करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने कुठेही कायदा सुव्यवस्था अबाधित होऊ नये म्हणून दहीहांडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी दही हांडा पोलीस स्टेशनच्या सर्व बीटामध्ये शांतता सभेचे आयोजन करण्यात आले.पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी शांतता कमेटीच्या सदस्यांना मार्गदर्शन करून सूचना केल्या आहेत..
कोई टिप्पणी नहीं