अखेर रामापूरचे तलाठी विरुद्ध जिल्हाधिकारी,पालकमंत्री कडे लेखी तक्रार ...!**दोषी विरुद्ध चौकशी करून कारवाईची केली मागणी
*अखेर रामापूरचे तलाठी विरुद्ध जिल्हाधिकारी,पालकमंत्री कडे लेखी तक्रार ...!*
*दोषी विरुद्ध चौकशी करून कारवाईची केली मागणी....!*
(महाराष्ट्र प्रतिनिधि शाहरुख शेख )
तालुक्यातील गट ग्राम पंचायत असलेले रामापूर येथील तलाठी राजेश बोकाडे व त्यांनी कामकाज पाहण्यासाठी ठेवलेला खाजगी वयक्ती शैलेंश धांडे यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी,पालकमंत्री, उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांचेकडे लेखि तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशी करून दोषी विरुद्ध कारवाईची अर्जदार यांनी मागणी करण्यात आलेली आहे.जिल्हाधिकारी यांचे मुख्यालयी हजर राहण्याचे कडक आदेश असून सुद्धा रामापूरचे तलाठी हे रामापूर येथे स्वतः मुख्यालयी हजर राहत नसून,अकोला येथून हप्त्यातून दोन तीन दिवस अपडाऊन करतात,त्यांनी कामकाज पाहणेसाठी शैलेश धांडे नामक खाजगी वयक्ती यांना ठेवले आहे.रामापूर येथीक तलाठी ऑफिस बंद बाबत पेपरला वृत्त प्रकाशित करण्यात आले होते त्याची कुठलीही दखल आज परंत घेण्यात न आल्यामुळे तलाठी व खाजगी वयक्ती दोघांच्या विरुद्ध लेखी तक्रार देण्यात आली आहे.रामापूर येथील तलाठी चार्ज हा बोकाडे यांचेकडे दिलेला असतांना कामकाज पाहण्यासाठी खाजगी वयक्ती धांडे यांना कोणी ठेवले,धांडे यांना कामकाज पाहणे करिता आदेश कोणी दिले,धांडे हे कुठलेही सरकारी कर्मचारी नसून स्वतः च्या मर्जीने वाटेल त्या वेळेस ऑफिस उघडून कामकाज चालवतात हा गंभीर प्रकार आहे.स्वतःला बिन पगारी फुल अधिकारी समजणारे धांडे नामक वयक्ती यांची सखोल चौकशी करून यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.तहसीलदार यांनी रामापूरचे तलाठी यांना रामापूर येथील ऑफिस उघडून मुख्यालयी हजर होण्याचे आदेश देऊन सुद्धा तलाठी हे हम करेसो कायदा ही भूमिका घेत असतील तर त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.तसेच रामापुर येथील तलाठी ऑफिसच्या आजूबाजूला काही लोकांनी अतिक्रमण केले होते ग्राम पंचायत सचिव रामापूर यांनी त्यांना दोनवेळ नोटीस सुद्धा बजावली आहे त्या मधील काही लोकांनी स्वतःहून अतिक्रमण काढले आहे व काही लोकांचे अतिक्रमण जागेवरच आहे त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई करून ग्राम पंचायत मार्फत अतिक्रमण काढण्याचे आदेश द्यावे अशी मागणी लेखी तक्रार द्वारे करण्यात आलेली आहे.या बाबत आता रामापूरचे तलाठी व त्यांनी ठेवलेला खाजगी वयक्ती यांचे विरुद्ध कुठली कारवाई करण्यात येते याकडे अर्जदार यांचे लक्ष लागले आहे.
कोई टिप्पणी नहीं