“शेतीसाठी डिजिटल शस्त्र: ‘महाविस्तार AI’ अॅपमुळे शेतकरी बनणार तंत्रज्ञान-सक्षम”
महाविस्तार एआय अॅप -- शेतीसाठी एक आधुनिक तंत्रज्ञानाची जोड :-- बदलत्या हवानास व परिस्थितीत अनुकूल सक्षम बनविण्यासाठी कृषि विभागाने मोबाईल मध्ये महाविस्तार एआय अॅप आणलेले आहे.सदरील अॅप शेतकर्यांना शेतीव्यवसायस अत्यंत उपयुक्त असून अद्यावत तंत्रज्ञान व कृषि विभागातील विविध योजना एका क्लिकवर उपलब्ध आहेत, सदरील मोबाईल तंत्रज्ञान विद्यार्थांना लवकर समजत असल्यानेच त्यांच्या या ज्ञानाचा फायदा घरच्यांना व शेतकरी आईवडीलांना व्हावा म्हणून शेतकरी मुलांना याबाबतीत प्रोत्साहन देवून जे विद्यार्थी स्वतःचे मोबाईल मध्ये मोबाईल अॅप डाऊनलोड करून गावातील ईतर शेतकर्यांचे करतील त्यांचा सन्मान करून त्यांना या विभागामार्फत प्रमाणपत्र देण्यात येवून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा अभिनव उपक्रम जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील कृषि अधिकाऱ्यांनी हाती घेतला आहे.या साठी गावनिहाय गावबैठका काॅर्नर बैठका घेऊन या अॅप ची जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे,याचा फायदा म्हणजेच शेतकर्यांना घरच्याच घरीच आपल्या मोबाईलवर शेतीविषयक तंत्रज्ञान, कृषि विभागातील सर्व योजनानिहाय माहिती तर होईलच शिवाय सदर ॲप मुळे महाडिबीटीवरील व नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातील योजनेअंतर्गत अर्ज सुद्धा करता येईल, म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हि माहिती पोहोचण्यासाठो महाविस्तार एआय मोबाईल ॲप डाऊनलोड करून घ्यावेत असे आवाहन रमेश जाधव तालुका कृषि अधिकारी यांनी केलेले आहेत.
rashtriya news
कोई टिप्पणी नहीं