स्वातंत्रवीर मंगल पांडे व खगोल शास्त्रज्ञ् जयंत नारळीकर यांच्या जयंती निमित्त ग्लोबल बंजारा अस्तित्व फॉउंडेशन तर्फे विदयार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
स्वातंत्रवीर मंगल पांडे व खगोल शास्त्रज्ञ् जयंत नारळीकर यांच्या जयंती निमित्त ग्लोबल बंजारा अस्तित्व फॉउंडेशन तर्फे विदयार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
चाळीसगाव (प्रतिनिधी) दि.19 जुलै रोजी जुनपानी व खराडी शाळेत 1857 च्या बंडातील स्वातंत्रवीर मंगल पांडे व सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ् आणि गणितज्ञ् पदम विभूषण व पदम भूषण पुरस्कार प्राप्त जयंत नारळीकर यांच्या जयंती निम्मित तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारी ग्लोबल बंजारा अस्तित्व फॉउंडेशन या संस्थे मार्फत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनपाणी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराडी या दोन शाळेत संस्थेचे अध्यक्ष अशोक राठोड यांच्या हस्ते मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यामागचा हेतू हाच कि मुलांनी शाळेत नियमित यावे आपल्याला काही तरी नवीन मिळते ह्या अपेक्षेने तरी मुलं नियमित शाळेत यावे व त्याच्या शैक्षणिक गुणवतात वाढ व्हावी व शालेय साहित्याच्या अभावी मुलं घरीच नं राहता त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व आपल्या परिस्थितीचा अभाव न राहता होतकरू व गरजू विदयार्थी यांनी अभ्यासात पुढे यावे. सोबतच भारत देशाला स्वतंत्र मिळवून देणारे क्रन्तिकारी यांच्या जयंती निम्मित असे छोटे छोटे उपक्रम राबवून त्या लहान मुलांना देखील महापुरुष क्रन्तिकारी यांचे जीवन परिचय व्हावे व त्यानंचे विचार त्याचें योगदान व देश सेवेसाठी आपल्या जीवाची पर्वा नं करतात हसत हसत देशासाठी आपले प्राणाचा त्याग समर्पण व त्यांनी केलेले कार्य हे देशासाठी समर्पित करून कसे जगावे. अन मरावे शास्त्रज्ञ् यांनी केलेली नवनवीन शोध हे आपल्या देशाच्या कामी कसे येईल या संदर्भात अशोक राठोड यांनी आपल्या मनोगततून मांडले. या प्रसंगी जुनपाणी शाळेचे मुख्यध्यापक ब्राम्हणकर सर शिक्षक पाटील सर ठुबे सर तसेच खराडी शाळेचे मुख्यध्यापक नागरे सर राठोड सर तसेच विदयार्थी व पालक उपस्थित होते. या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे..
कोई टिप्पणी नहीं