कोल्हापूर येथील घटनेचा समाजवादी पार्टीच्या जलगाव जामोद शहर अध्यक्ष सैय्यद नफीज यांच्या वतीने निषेध
कोल्हापूर येथील घटनेचा समाजवादी पार्टीच्या जलगाव जामोद शहर अध्यक्ष सैय्यद नफीज यांच्या वतीने निषेध
आज दिनांक 19/7/2024 रोजी
दोशींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन
जलगाव जामोद
कोल्हापूरच्या विशालगड व गाजापूर येथे मुस्लिमांवर व मशिदीवर हल्ला करण्यात आला सदर घटना निंदनीय असून या घटनेचा समाजवादी पार्टी शहर अध्यक्ष वतीने निषेध करण्यात आला व या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले याबाबत सय्यद नफिज शहर अध्यक्ष समाजवादी पार्टी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जलगाव जामोद उप विभागीय अधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की कोल्हापूर येथील विशालगड व गाजापुर येथे अतिक्रमण काढण्याच्या नावावर काही समाजकंटकांनी कोणतीही परवानगी नसताना मोर्चा काढला होता या मोर्चाच्या दरम्यान मुस्लिम समाजाच्या लोकांवर अत्यंत भ्याड पाणी हल्ला करण्यात आला यावेळी मजीद दर्गा याची तोडफोड करण्यात आली तर महिलांना व मुलांना मारहाण करण्यात आली सदर घटना निंदनीय असून त्या घटनेचा आम्ही निषेध करतो यामधील दोशींवर त्वरित कारवाई करण्यात यावी व मुस्लिम समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली सदर निवेदन देताना, युवा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आझाद पठाण व महिला जिल्हाध्यक्षा उमा ताई बोचरे व युवा जिल्हा उपाध्यक्ष शेख नदिम व जलगाव जामोद तालुका अध्यक्ष मुस्ताक जमदार व मुशर्रफ शाह व सादिक पठाण व समशेर खान व इरफान खान व शेख सलमान व सय्यद कमर व असलम खान व रिजवान काझी व शेख सोहेल व शेकडो कार्यकर्ता यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आला आहे
कोई टिप्पणी नहीं