हिवरखेड मध्ये मनसेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन
हिवरखेड मध्ये मनसेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन
ग्रामपंचायतने भ्रष्टाचार केल्याचा मनसेचा आरोप
*हिवरखेड प्रतिनिधी
हिवरखेड शहरात स्वच्छता अभियान योजने अंतर्गत होत असलेल्या भ्रष्टाचारावर आळा बसावा तसेच सदर भ्रष्टाचार करणारे संबंधित अधिकारी तथा इतर यांच्यावर कार्यवाही व्हावी या हेतूने माहिती मागविण्यात आली होती
परंतु एक वर्षाचा कालावधी उलटूनहीं आम्हाला योग्य ती माहिती न मिळाल्यामुळे आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागत आहे तसेच सदर बाबतीत मा चौकशी अधिकारी पंचायत समिती तेल्हारा यांचे आदेश असताना सुद्धा आम्हाला माहिती न देणे तसेच सदरचा अहवाल पंचायत समिती कार्यालयात दडवून ठेवणे दि 5 /9 /2023 रोजी दहा ते अकरा या दरम्यान हिवरखेड येथे कालीपिली स्टैंड वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले आहे त्यावेळी हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडव साहेब व त्यांचे सहकारी यांनी अटक करून सुटका केली ता संघटक पवन नेरकर शहराध्यक्ष रोहन झगडे श्याम ओंकारे कुणाल ढबाले प्रफुल कवळकार संतोष ढगे सागर ढगे राहुल इंगोले सनी वनकर प्रशांत वनकर आदींची उपस्थिती होती
कोई टिप्पणी नहीं