A description of my image rashtriya news खळबळ! मामा भाचा डोहात पुन्हा आढळला मृतदेह; २ दिवसांपूर्वीच...मामा भाच्याच्या डोहात पुन्हा एकदा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. - Rashtriya News Khabre Desh Prdesh Ki

Header Ads

खळबळ! मामा भाचा डोहात पुन्हा आढळला मृतदेह; २ दिवसांपूर्वीच...मामा भाच्याच्या डोहात पुन्हा एकदा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

खळबळ! मामा भाचा डोहात पुन्हा आढळला मृतदेह; २ दिवसांपूर्वीच...

मामा भाच्याच्या डोहात पुन्हा एकदा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र प्रतिनिधि शाहरुख शेख 

अकोला: अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या वारी हनुमान येथील मामा भाचाच्या डोहात पुन्हा एकदा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे. मामा भाचाच्या डोहात आतापर्यंत अनेकांचा बुडून मृत्यू (Death) झाला आहे. त्यामुळे हा डोह मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. आज पुन्हा एकदा या डोहात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.


धक्कादायक! जावयाने सासऱ्याला कालव्यात ढकललं; मृतदेह काढताना लहान भाऊही बुडाला

वारी येथील मामा-भाचा डोहात एकाच आठवड्यात दुसरा बळी गेला आहे. आज एक अनोळखी मृतदेह तरंगताना दिसला, या मृतकाने लाल रंगाचे कपडे घातलेले आहेत. वारीचे सरपंच शिवाजी पतींगे यांनी हिवरखेड पोलिसांना कळविल्यानंतर हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दोन तीन दिवसांपूर्वीच अकोला येथील राज गुढधे नामक युवक याच डोहात बुडून मृत्यू (Death) पावला होता. दरम्यान या डोहातील खड्डे बुजविण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून करण्यात आली आहे.
हे देखील पाहा



दोन दिवसापूर्वी आढळला होता तरुणाचा मृतदेह
दोन दिवसापूर्वी अकोल्यातील युवक वारी हनुमान येथे दर्शनासाठी गेले होते. यातील काही मित्र मंदिराकडे होते. तर काही मामा भाच्याच्या डोहाकडे अंघोळ करण्यासाठी गेले. यात एका युवकाचा डोहात बुडून मृत्‍यू (Death) झाल्‍याची घटना समोर आली होती.
मित्रांनी आरडाओरड केली तेव्हा आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत सदर युवक बुडाला होता. याबाबत वारी येथील सरपंच शिवा पतींगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन याबाबत हिवरखेड पोलिसांना (Police) माहिती दिली

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.